पुस्तकाचे नाव - साये में धूप
लेखक / कवी - दुष्यन्त कुमार
आवृत्ती - प्रथम आ. १ जानेवारी १९७५
पृष्ठ संख्या - ६३
मूल्य - रु ११५
प्रकाशन - राजकमल प्रकाशन
तू किसी रेल सी गुज़रती है मैं किसी पुल सा थरथराता हूँ
"मसान" माझा सर्वात आवडता चित्रपट. चित्रपट बघत असतांना गाण्यात हे शब्द ऐकले आणि कोणी लिहिले आहेत हे शोधले आणि मला हे पुस्तक आणि पर्यायाने दुष्यन्त कुमार सापडले. दुष्यन्त कुमारांचा जन्म उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील नवादा गावात झाला होता. त्यांनी अलाहाबादमधून हिंदीमध्ये एम.ए. केली. त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीची सुरुवात अलाहाबादमध्ये झाली. त्यांनी अनेक नाटके, कविता, गज़ल, लघुकथा लिहिल्या. त्यांनी परिमल साहित्य अकादमीच्या संगोष्ठींमध्ये सक्रियपणे सहभाग घेतला. त्यांनी त्या काळातील एक महत्वाचे भारतीय वृत्तपत्र 'नये पत्ते', आकाशवाणी आणि मध्य प्रदेशातील राजभाषा विभागासोबत देखील काम केले. त्यांची कविता थेट हृदयाला स्पर्श करते. डॉ. कुमार विश्वास, पुष्पेंद्र नागर, मनोज मुंतशीर, वरुण ग्रोव्हर या सारखे अनेक नवीन कवी त्यांच्यापासून प्रेरणा घेतात. दुष्यन्त कुमारांचे निधन ३१ डिसेंबर, १९७५ रोजी वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी झाले, परंतु आपल्या अल्पश्या आयुष्यातच त्यांनी हिंदी साहित्याच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली. त्यांच्यामुळे गझलाला हिंदीमध्ये देखील लोकप्रियता मिळाली असे म्हणतात. आजही त्यांचे शेर आणि गझल साहित्यिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये म्हटले जातात.
दुष्यन्त कुमारचा गझल संग्रह "साये में धूप" त्या काळातील रचना आहे जेव्हा भारत देश काही दशकांपूर्वीच स्वतंत्र झाला होता, परंतु राजकारणाविषयी निराशा समाजात आणि नंतर साहित्यात स्पष्टपणे दिसू लागली होती. काही प्रसिद्ध गझली जसे 'हो गयी है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए', 'कहाँ तो तय था चरागाँ हर एक घर के लिए' तुम्ही नक्कीच ऐकल्या असतील कारण राजकीय विश्लेषण करताना या गझलींच्या माध्यमातून अपयशांना दर्शविले जाते. दुष्यन्त कुमारच्या गझलींमध्ये गरिबांबद्दलची सहानुभूती स्पष्टपणे दिसते. उदाहरणार्थ पाहा -
'ना हो कमीज़ तो पावों से पेट ढँक लेंगे,
ये लोग कितने मुनासिब हैं इस सफ़र के लिए।'
'ये सारा ज़िस्म झुककर बोझ से दुहरा हुआ होगा
मैं सज़दे में नही था, आपको धोखा हुआ होगा।'
'चट्टानों पर खड़ा हुआ तो छाप रह गई पावों की सोचो कितना बोझ उठाकर मैं इन राहों से गुज़रा।'
असे नाही की सामान्य जनतेचा आवाज त्या वेळी फक्त दुष्यन्त कुमारजींनीच उठवला होता. इतर अनेक साहित्यकारांनी देखील लिहीत होते, परंतु बहुतेकांनी गद्यात, पद्यात टीका किंवा व्यंग हे मार्ग निवडले होते. दुष्यन्त कुमार यांनी मात्र हीच खंत गझलींच्या रूपात आणून एक वेगळाच अंदाज व्यक्त केला. शासनव्यवस्थेत पसरलेली पंगुता आणि भ्रष्टाचार त्यांनी या शेरांच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
'यहाँ तक आते-आते सूख जाती हैं कई नदियाँ, मुझे मालूम है पानी कहाँ ठहरा हुआ होगा।' 'भूख है तो सब्र कर, रोटी नहीं तो क्या हुआ, आजकल दिल्ली में है ज़ेरे बहस ये मुद्दआ।' 'इस सड़क पर इस क़दर कीचड़ बिछी है हर किसी का पाँव घुटने तक सना है।'
दुष्यन्त कुमारजींनी फक्त जनतेच्या हालअपेष्टांना स्थान दिले असे नाही. फक्त नकारात्मक सूर नाही लावलेला त्यांनी. अनेक गझलींमध्ये आशावादी स्वर देखील आहेत. काही शेर पाहा -
'एक चिंगारी कहीं से ढूंढ़ लाओ दोस्तों, इस दीये में तेल से भीगी हुई बाती तो है।' 'कैसे आकाश में सुराख़ नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालों यारों।'
दुष्यन्त कुमारजींच्या गझलींचे आणखी काही रुचकर आणि मला आवडलेले अंश -
'मौत ने तो धर दबोचा एक चीते की तरह, ज़िंदगी ने जब छुआ तब फासला रखकर छुआ।' 'सिर्फ़ हंगामा खड़ा करना मेरा मक़सद नहीं मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।' 'मूरत सँवारने में बिगड़ती चली गई, पहले से हो गया है ज़हाँ और भी खराब।'
दुष्यन्त कुमारजींच्या लेखनाची विशेषता अशी आहे की त्यांच्या लिखाणात लपलेला अर्थ शोधण्यात एक वेगळीच मज्जा आहे, आणि जेव्हा तो अर्थ आपण शोधून काढतो, स्वतःच्या अनुभवांशी जोडून पाहतो, तेव्हा एका हलक्या हास्याबरोबर दुष्यन्त कुमारजींच्या गझलींचा जादू आणि त्यातला ठहराव आपोआपच आपल्या मनाचा ठाव घेते. त्यांना वाचतांना साहिर लुधियानवींचा सतत भास होतो. अशांतता आणि बंडखोरी दुष्यन्त कुमारांच्या शब्दांतून स्पष्टपणे बाहेर पडते. त्यांच्या शब्दांची आग आपल्या हृदयात देखील एक ठिणगी पेटवून जाते. मी जेव्हा ह्या ओळी वाचल्या तेव्हा या ओळींच्या प्रेमात पडलो:
कल नुमाइश में मिला वो चीथड़े पहने हुए, मैंने पूछा नाम तो बोला कि हिंदुस्तान है। रह—रह आँखों में चुभती है पथ की निर्जन दोपहरी खैर, आगे और बढ़ें तो शायद दृश्य सुहाने आएँगे
दुष्यन्त कुमारजींने जे आपल्या ह्या पुस्तकाच्या शेवटी खूप छान लिहिले आहे. मला राहवले नाही म्हणून इथे टाकत आहे:
जिंदगी में कभी-कभी ऐसा दौर आता है जब तकलीफ गुनगुनाहट के रास्ते बाहर आना चाहती है ! उसमे फंसकर गेम-जाना और गेम-दौरां तक एक हो जाते हैं ! ये गजलें दरअसल ऐसे ही एक दौर की देन हैं ! यहाँ मैं साफ़ कर दूँ कि गजल मुझ पर नाजिल नहीं हुई ! मैं पिछले पच्चीस वर्षों से इसे सुनता और पसंद करता आया हूँ और मैंने कभी चोरी-छिपे इसमें हाथ भी आजमाया है ! लेकिन गजल लिखने या कहने के पीछे एक जिज्ञासा अक्सर मुझे तंग करती रही है और वह है कि भारतीय कवियों में सबसे प्रखर अनुभूति के कवि मिर्जा ग़ालिब ने अपनी पीड़ा की अभिव्यक्ति के लिए गजल का माध्यम ही क्यों चुना ? और अगर गजल के माध्यम से ग़ालिब अपनी निजी तकलीफ को इतना सार्वजानिक बना सकते हैं तो मेरी दुहरी तकलीफ (जो व्यक्तिगत भी है और सामाजिक भी) इस माध्यम के सहारे एक अपेक्षाकृत व्यापक पाठक वर्ग तक क्यों नहीं पहुँच सकती ? मुझे अपने बारे में कभी मुगालते नहीं रहे ! मैं मानता हूँ, मैं ग़ालिब नहीं हूँ ! उस प्रतिभा का शतांश भी शायद मुझमें नहीं है ! लेकिन मैं यह नहीं मानता कि मेरी तकलीफ ग़ालिब से कम हैं या मैंने उसे कम शिद्दत से महसूस किया है ! हो सकता है, अपनी-अपनी पीड़ा को लेकर हर आदमी को यह वहम होता हो...लेकिन इतिहास मुझसे जुडी हुई मेरे समय की तकलीफ का गवाह खुद है ! बस...अनुभूति की इसी जरा-सी पूँजी के सहारे मैं उस्तादों और महारथियों के अखाड़े में उतर पड़ा !
हे एक उत्कृष्ट कविता व गझलांचे छोटेसे पुस्तक आहे. आपण सगळ्यांनी जरूर वाचा आणि लोकांपर्यंत पोचावा.
-- विश्वेश
Personal to universal ❤️